धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी स्वतंत्र बँक खाते आवश्यक असून, सर्व खर्च ऑनलाईन करणे अपेक्षित आहे. जिल्हा परिषद सदस्य निवडणुकीसाठी 6 लाख रूपये तर पंचायत समिती सदस्य निवडणुकीसाठी 4.50 हजार रूपये खर्च मर्यादा असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तहसील मृणाल जाधव, आचार संहिता प्रमुख तथा गटविकास अधिकारी संतोष नलावडे उपस्थित होते.

पुढे अधिक माहिती देताना देशमुख यांनी उमेदवारी अर्ज भरताना घरी शौचालय असून, त्यांचा वापर चालू आहे यांचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे ग्रामपंचायतची कोणतीही थकबाकी नाही, दोन अपत्याबाबताचे घोषणापत्र आदी आवश्यक असल्याचे सांगितले. उमेदवारी अर्ज भरताना खुल्या प्रवर्गात जिल्हा परिषदसाठी 1 हजार रूपये तर पंचायत समिती निवडणुकीसाठी 700 रूपये तर आरक्षित प्रवर्गासाठी जि. प. साठी 500 रूपये तर पं. स. साठी 350 रूपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. धाराशिव तालुक्यात एकूण 12 जिल्हा परिषद सदस्य तर पंचायत समिती एकूण 24 सदस्य यासाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी 2 लाख 49 हजार 894 मतदार आहे. यावेळी आचार संहिता प्रमुख संतोष नलावडे यांनी निकोप वातावरणात निवडणूक होण्यासाठी सर्व पक्षांनी आचार संहिता पाळणे बंधनकारक आहे. 

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top