वाशी (प्रतिनिधी)- येथील इंदापूर रोडवरील सिद्धिविनायक गणेश मंदिरामध्ये गुरुवार (दि.22)जानेवारी रोजी माघी गणेश जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करून गणेश जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
सकाळी सात ते नऊ या वेळेत श्रीगणेशाला राकेश शिंगणापुरे व विश्वजीत देशमुख यांचे हस्ते सपत्नीक महाअभिषेक करून अथर्वशीर्ष पठणचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर सुश्राव्य भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. दुपारी बारा वाजता गणेश जन्मोत्सव मोठ्या उत्साहात,भक्तिमय वातावरणात मोठ्या प्रमाणावर उपस्थित भाविकांच्या समवेत साजरा करण्यात आला.
त्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. यावेळी थोबडे भजनी मंडळ, देवकर सांप्रदायिक भजनी मंडळ, विठ्ठल रुक्मिणी मंदिर भजनी मंडळ, काशी विश्वनाथ भजनी मंडळ, जिजाऊ महिला भजनी मंडळ या भजनी मंडळांनी भजनाचा सुस्राव्य कार्यक्रम सादर केला. कार्यक्रम यशस्वितेसाठी बाळासाहेब कवडे, रामेश्वर मोळवणे, मुकुंद शिंगणापूरे, गणेश मोळवणे,सूर्यकांत मोळवणे, बापू येताळ, समाधान जगदाळे, आनंदराव उंदरे, विश्वजीत देशमुख, सुधीर चेडे, बाळासाहेब उंदरे, संदीप हुंबे, महादेव कवडे, अमित उंदरे, बंडू उंदरे, विकास कवडे, राहुल कवडे, विकास पांढरपट्टे, मुकुंद चेडे, गौतम चेडे आदींनी परिश्रम घेतले.
