धाराशिव (प्रतिनिधी)- शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी अभ्यासाची सवय लावल्यास त्यांना भविष्यात स्पर्धात्मक परीक्षेत घवघवीत यश मिळते त्या माध्यमातून उच्च पद प्राप्त करता येते. त्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्यपूर्ण अभ्यास करून खेळाकडेही लक्ष द्यावे कारण आयपीएस सारख्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये खेळास ही महत्त्व आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये एवढे चांगले शिक्षण मिळते हे पाहून आपणास आनंद झाल्याचे मत प्रशिक्षणार्थी आयपीएस मेघना आय एन यांनी धाराशिव तालुक्यातील जि. प. प्रशाला वडगाव (सि) येथील बाल आनंद मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. या मेळाव्याचा शुभारंभ क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्रशिक्षणार्थी आयपीएस मेघना आय एन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक श्री दराडे, मुख्याध्यापिका ज्योती राऊत , शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सोमनाथ पाटील , पोलिस पाटील, बापू जाधव , केंद्र प्रमुख भालचंद्र कोकाटे , माध्यमिक शिक्षक भास्कर खडबडे , सुधीर गायकवाड , सहशिक्षिका सरोजा पाटील सुचिता शेलार , निर्मला गुरव, रेखा डाके, माधुरी पौळ , आरती कर्पे , शिंदे मँडम , भूषण मदने आदीसह गावातील माता पालक बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रशिक्षणार्थी आयपीएस मेघना आय एन यांनी शालेय जीवनातच मुलांनी अभ्यासाची सवय लावल्यास त्यांना पुढील स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळते , मुलांनी मोबाईल पासून दूर राहून अभ्यासाची सवय लावणे महत्त्वाचे आहे. सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास उच्च ध्येय प्राप्त करता येते असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी बाल आनंद मेळाव्यात सहभागी विद्यार्थ्यांच्या विविध स्टॉलला भेट देऊन त्यांच्याकडून विविध वस्तू व खाद्यपदार्थाची माहिती घेऊन त्यांनी स्वतः खरेदी केली व विविध पदार्थांचा आस्वाद देखील घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्याशी मनमोकळा संवाद देखील साधला. यावेळी उपस्थित माता पालकांना हळदी - कुंकू व तिळगुळ देण्यात आले. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक , विद्यार्थी, बहुसंख्येने माता पालक व शिक्षणप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.
