वाशी (प्रतिनिधी)- आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी बुधवारपर्यंत दाखल करण्यात आलेल्या अर्जांची गुरुवारी (दिनांक 22) करण्यात आली.उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी (दि.21) जिपच्या तीन गटासाठी पस्तीस उमेदवारांचे 45 अर्ज दाखल करण्यात आले होते. आणि पं.स. च्या सहा गणांसाठी 55 उमेदवाराचे 67 अर्ज दाखल करण्यात आले होते.
गुरुवारी दि.22 जानेवारी रोजी झालेल्या छाननीत पारगाव जिप गटासाठी 9, पारा गटासाठी 10, तेरखेडा गटासाठी 12 असे तीन गटासाठी 31 अर्ज वैध ठरले. पंचायत समितीच्या पारगाव गणात 5, सरमकुंडी गणात 7, पारा गणात 14, बावी गणात 11, इंदापूर र्गीात 8 तर तेरखेडा गणात 6 असे एकूण सहा गणांसाठी 51 अर्ज वैध ठरले आहेत.