धाराशिव (प्रतिनिधी)-   पळसप ता. धाराशिव येथे आज शासन हमी भाव खरेदी केंद्राचा श्रीगणेशा करण्यात आला.पळसप येथील कुलस्वामिनी कृषी प्रक्रिया व पणन सहकारी संस्था मर्यादित पळसप या संस्थेस महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन यांचेकडून मान्यता मिळाली असून, थेट शेतकरी सोयाबीन खरेदी करण्यासाठी शासन मान्य व हमी भाव सोयाबीन रू.5328 प्रति क्विंटल  प्रमाणे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष नितीन बागल, शिवसेना तालुका प्रमुख अजित लाकाल,  तंटामुक्ती अध्यक्ष विजय करंजकर, उपाध्यक्ष महादेव निकम, संस्थेचे चेअरमन लक्ष्मण सरडे,संचालक सुरेश फुटणे, अरविंद सरडे, दिलीप मेहत्रे, खालिद पटेल, बाळासाहेब सरडे, धनंजय लाकाल, विकास झांजे,खात्रीबा माळी,संतोष मगर, प्रवीण लाकाल,बबन निकम,बालाजी सुरवसे, वाजेद पटेल, आदि मान्यवर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी बोलताना चेअरमन लक्ष्मण सरडे यांनी परिसरातील शेतकऱ्यांना सोयाबीन हमी भाव केंद्रावर आणून घालावे असे आव्हान केले. नोंदणी तारीख 30 जानेवारी 2026 पर्यंत असल्याचे ही सांगण्यात आले.

 
Top