धाराशिव (प्रतिनिधी)-  गावसूद येथील ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी शिवसेना ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केला. हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली,संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते हा प्रवेश घेण्यात आला.

युवासेना जिल्हाप्रमुख रवींद्र वाघमारे यांच्या पुढाकारात गावसूद येथील आकाश नानासाहेब तेरकर, जितेंद्र देशमुख, नानासाहेब सगर, बालाजी तेरकर, बप्पा एडके, दादासाहेब साळुंखे, प्रकाश घायाळ, ऋषी घायाळ, अभिषेक तेरकर, सुरज एडके, विशाल एडके, बालाजी लांडगे, राजेश निचळ, मोहन घायाळ, परमेश्वर गायकवाड, आकाश दशरथ, सगर सचिन, अजय लांडगे, विश्वजीत सगर, समर्थ सुरवसे, अभिजीत सुरवसे, राज सगर, करण सगर, विशाल गायकवाड आदींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला. 

यावेळी तालुकाप्रमुख सतीश सोमानी, शहरप्रमुख सोमनाथ गुरव, माजी पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव, नगरसेवक पंकज पाटील, युवानेते किरण बोचरे, वडगाव उपसरपंच जयराम मोरे, विक्रम  पाटील, जिल्हा प्रवक्ते तानाजी जाधवर, संभाजी सलगर, अक्षय खळदगर, रोहन देशमुख उपस्थित होते.

 
Top