परंडा (प्रतिनिधी)- जगातील सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातात महानगरपालिका निवडणूकीत मोठे दैदिप्यमान यश मिळवून भाजपा पक्ष अव्वल ठरला आहे. भारतीय जनता पार्टीच्या या अभुतपुर्व यशाबद्दल भारतीय जनता पार्टीच्या वतीने परंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, परंडा येथे मोठा जल्लोष साजरा केला. भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी उपस्थित सर्वांना पेढा भरवत शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांनी हलगी वाजवत फटाके फोडत भारतीय जनता पार्टीचा विजय असो अशा घोषणा देत मोठा जल्लोष करण्यात आला.

यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, युवा नेते परंडा नगरपरिषदचे उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, माजी उपनगराध्यक्ष सुबोधसिंह ठाकूर, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, नगरसेवक तथा युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष ॲड. जहीर चौधरी, विकास कुलकर्णी, ता. सरचिटणीस धनाजी गायकवाड, शिवाजीराव पाटील, शहाजीआप्पा पाटील, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष तुकाराम हजारे, श्रीराम देवकर, कांतीलाल पाटील, श्रीमंत शेळके, बबनराव चौधरी, अरुण करळे, बाळासाहेब गोडगे, पांडुरंग मुसळे, दिव्यांग आघाडी संयोजक तानाजी घोडके, साहेबराव पाडुळे, विलास खोसरे, जयंत सायकर, भारत भोई, महावीर भोई, रविकुमार गरड, धनंजय काळे, मनोहर पवार, गौरव पाटील, अजिम हन्नुरे, संतोष गायकवाड, आकाश मदने, अमर ठाकूर, कार्तीक दिक्षित, तुषार कोळेकर, समाधान कोळेकर, व्यंकटेश दिक्षित महिला मोर्चा शहराध्यक्षा जोतीताई भातलवंडे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top