धाराशिव (प्रतिनिधी)- बोरखेडा गावाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून गावातील रस्ता, शेतरस्ते व स्मशानभूमीचे भूमिपूजन भाजपा नेते नितीन काळे यांच्या हस्ते संपन्न झाले. गावकऱ्यांच्या दैनंदिन सोयीसुविधा, स्वच्छता तसेच मूलभूत गरजांचा विचार करून ही विकासकामे मार्गी लावण्यात आली आहेत.
ही विकासकामे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून मंजूर निधीतून करण्यात येत असून, यामुळे गावाच्या विकासाला भक्कम पाठबळ मिळाले आहे. तसेच आगामी काळात बोरखेडा गावामध्ये 50 लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची विविध विकासकामे लवकरच सुरू होणार असून, यामुळे गावाच्या पायाभूत सुविधा अधिक मजबूत होतील व विकासाला नवी गती मिळेल.
लोकसहभाग, विश्वास आणि विकास यांचा संगम साधत बोरखेडा गाव प्रगतीच्या नव्या वाटेवर पुढे जात असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. “गावाचा विकास, हीच खरी सेवा” या भावनेतून ही कामे राबविण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले. यावेळी उपस्थितांना विकासाला साथ द्या, राणा दादांना साथ र्द्यों असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून बालाजी गावडे यांची उपस्थिती लाभली. तसेच नितीन काळे, नितीन शेरखाने, साधु पुरी महाराज, रामेश्वर पाटील, प्रेमनाथ पाटील, जगनाथ सुरवसे, हनुमंत कवडे, दिलीप गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
