भूम (प्रतिनिधी)- भूम नगर परिषदेच्या उपनगराध्यक्षपदी जनशक्तीच्या लक्ष्मी साठे तर स्वीकृत नगरसेवकपदी यशवंतराव थोरात यांची बिनविरोध निवड झाली. त्यांचे सर्वांनी स्वागत करून कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
शुक्रवार दि. 16 जानेवारी 2026 रोजी भूम नगर परिषदेच्या उपनगराध्यक्ष, गटनेतेपद, मूख्य प्रतोद व स्वीकृत नगर सेवकाच्या निवडी संदर्भात प्र. मुख्याधिकारी प्रविण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रक्रिया करण्यात आली आहे. यावेळी उपाध्यक्षपदी लक्ष्मी साठे, गटनेतेपदी रुपेश शेंडगे, मुख्य प्रतोदपदी विठठल बागडे, तर स्वीकृत नगरसेवक पदी यशवंतराव थोरात यांची निवड करण्यात आली. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, भाजपचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, जिल्हा उपाध्यक्ष महादेव वडेकर, ओबीसी जिल्हा उपाध्यक्ष शरद चोरमले, कामगार मोर्चा जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटिल, शहर अध्यक्ष बाबासाहेब वीर, माजी पंचायत समिती सदस्य सिताराम वनवे, प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, अल्प संख्यांक तालुका अध्यक्ष प्रदिप साठे, सहकार आघाडी तालुका अध्यक्ष चंद्रकांत गवळी, शुभम खामकर, सिद्धार्थ जाधव, महिला जिल्हा उपाध्यक्ष लता गोरे, आदिवाशी पारधी महासंघ तालुका अध्यक्ष दत्ता काळे यांचेसह जनशक्ती आघाडीचे सर्व 15 नगरसेवकांची उपस्थिती होती.
