कळंब (प्रतिनिधी)-  सध्याच्या परिस्थितीत इंधन बचत करणे ही केवळ गरज नसून काळाची अपरिहार्यता आहे. इंधनाची बचत करून राष्ट्राच्या विकासाला हातभार लावला पाहिजे, असे प्रतिपादन कळंब आगार संत श्रेष्ठ गोरोबा काका शाशकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे प्राचार्य केशव पवार यांनी केले.

राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने दि. 16 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या इंधन बचत मोहिमेचा शुभारंभ दि. 16 जानेवारी रोजी कळंब बस आगारात मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक विनोद अलकुंठे हे होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय यंत्र अभियंता सुर्यकांत थोरबोले, संतश्रेष्ठ गोरोबाकाका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था चे प्राचार्य केशव पवार, नितेश पडद्यन, प्रा. मोहन जाधव, कार्यशाळा अधीक्षक बालाजी भारती, स्थानक प्रमुख सुरज पायाळ, निलेश जाधव   यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी राज्य परिवहन महामंडळातील वाहक, चालक व यांत्रिक कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना इंधन बचतीचे महत्त्व सांगितले. इंधनाचा योग्य वापर करून प्रत्येक आगार तोट्यातून नफ्यात कसा आणता येईल, याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रभाकर झांबरे यांनी मानले. या प्रसंगी वाहतूक नियंत्रक नामदेव जगताप, लखन कांबळे, श्रीमती शिंदे मॅडम, शेख मॅडम, वैभव बंडे, चौवरे, विलास जाधव आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी यांत्रिक कर्मचारी, वाहक व चालकांनी विशेष परिश्रम घेतले. इंधन बचत मोहिमेमुळे आगाराच्या कार्यक्षमतेत वाढ होऊन एसटी महामंडळाला आर्थिक बळकटी मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

 
Top