धाराशिव (प्रतिनिधी)-  नूतन प्राथमिक विद्यामंदिर, येथील इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी गणपतीपुळे, रत्नागिरी, डेरवण, प्रतापगड, महाबळेश्वर

या ऐतिहासिक, धार्मिक व निसर्गसौंदर्याने नटलेल्या ठिकाणी शैक्षणिक सहल यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आलेली आहे.

या शैक्षणिक सहलीचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील ज्ञान प्रत्यक्ष अनुभवातून समजावे, त्यांना इतिहास, भूगोल, संस्कृती, निसर्ग व पर्यटनस्थळांची माहिती मिळावी, तसेच विद्यार्थ्यांमध्ये संघभावना, शिस्त, निरीक्षणशक्ती व सामाजिक जाणीव निर्माण व्हावी हा आहे. सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी गणपतीपुळे येथील श्री गणपती मंदिर, रत्नागिरी व डेरवण येथील ऐतिहासिक व सांस्कृतिक स्थळे, प्रतापगड किल्ला तसेच महाबळेश्वर येथील निसर्गरम्य परिसर यांची माहिती प्रत्यक्ष पाहून घेतली. यामुळे विद्यार्थ्यांचा इतिहास व भूगोल विषयावरील अभ्यास अधिक सखोल झाला.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेस सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले असून, सहलीदरम्यान अनुभवी शिक्षकवर्ग, कर्मचारी व आवश्यक व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. पालकांच्या सहकार्यामुळे व शिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे ही सहल अत्यंत शिस्तबद्ध, सुरक्षित व यशस्वी ठरली. या उपक्रमाबद्दल पालक, शिक्षणप्रेमी नागरिक व स्थानिक स्तरावरून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास निश्चितच मदत होते, असे मत शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केले आहे.

 
Top