तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर नगरपरिषदेसाठी महाविकास आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेवक अमोल माधवराव कुतवळ यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबाबतचे शिफारसपत्र काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले आहे. तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे पाच नगरसेवक निवडून आले असून, पक्षाच्या नगरपालिकेतील अधिकृत गटासाठी नुकत्याच झालेल्या बैठकीत अमोल कुतवळ यांची गटनेते म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
या शिफारस अर्जावर नगरसेवक अक्षय धनंजय कदम, प्रगती गोपाळ लोंढे, रणजीत चंद्रकांत इंगळे व आनंद ननानासाहेब जगताप यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. नगरसेवक अमोल कोतवळ हे काँग्रेस पक्षात लढवय्ये व सक्रिय नेते म्हणून परिचित आहेत. नगरसेवक नसतानाही त्यांनी शहरातील विविध नागरी प्रश्नांवर अनेक आंदोलने केली असून, त्यांच्या सामाजिक व राजकीय अनुभवाचा विचार करून काँग्रेस पक्षाने त्यांची गटनेतेपदी निवड केली आहे. गटनेते अमोल कुतवळ हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव कुतवळ यांचे चिरंजीव असून, त्यांच्या नेतृत्वाखाली नगरपरिषदेत विरोधी पक्षाची भूमिका अधिक प्रभावीपणे मांडली जाईल, अशी अपेक्षा काँग्रेस कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.
