धाराशिव (प्रतिनिधी)- ग्राहक संरक्षण या कायद्यासंदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी या उद्देशाने दि.23 जानेवारी 2026 रोजी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय, धाराशिव येथे वाणिज्य विभागाच्या वतीने ग्राहक संरक्षण कायदा-2019 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मेधा कुलकर्णी यांनी ग्राहक संरक्षण कायदा आणि विद्यार्थी या विषयावर मार्गदर्शन केले.
यानंतर पूनम तापडिया ग्राहक पंचायतीची स्थापना आणि उद्दिष्टे या विषयावर मार्गदर्शन करत असताना विद्यार्थीदशेतच कायदा समजला पाहिजे, असे प्रतिपादन केले. शरद वडगावकर यांनी ग्राहक तक्रार निवारण यंत्रणा या विषयावर मार्गदर्शन केले. या एकदिवसीय कार्यशाळेतून ग्राहक संरक्षण कायद्याचे मिळालेले ज्ञान विद्यार्थी प्रत्यक्षात व्यवहारात वापरतील ही अपेक्षा अध्यक्ष मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांनी व्यक्त केली. सदर कार्यशाळेचे प्रास्ताविक प्रा. बालाजी नगरे यांनी केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन सुप्रिया शेटे यांनी केले. तर आभार प्रदर्शन डॉ. अवधूत नवले यांनी केले. डॉ. अमर निंबाळकर, डॉ. दत्ता साखरे, प्रा. माधव उगीले आदी शिक्षक वृंद यावेळी उपस्थित होते. यावेळी वरिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य शाखेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
