कळंब (प्रतिनिधी)- येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने थोर स्वातंत्र्यसेनानी सुभाष चंद्र बोस यांची 129 जयंती व हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची 100 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजनाने झाली. ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर साहेब यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. याप्रसंगी सुभाष चंद्र बोस यांच्या स्वातंत्र्यपूर्व काळामधील त्यांचे कार्याचे स्मरण करण्यात आले. तुम मुझे खून दो मै तुम्हे आजादी दूंगा असे आवाहन त्यांनी भारतीयांना केले. या माध्यमातून त्यांनी सर्व भारतीय तरुणांना एकत्रित करून ब्रिटिशाविरुद्ध लढा देण्याचे काम त्यांनी केले. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे समाजकारण व राजकारणामध्ये असणारी त्यांची भूमिका स्पष्ट करण्यात आले. या कार्यक्रमासाठी व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भगवान सर व माजी प्राचार्य डॉ. सुनील पवार हे उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य.डॉ.के डी जाधव सर तसेच प्रा. डॉ. ईश्वर राठोड, प्रा. डॉ.दादाराव गुंडरे,प्रा.डॉ.अनिल फाटक, प्रा. डॉ. सुरेश वेदपाठक, प्रा.डॉ.श्रीकांत भोसले, महाविद्यालयाचे अधीक्षक हनुमंत जाधव तसेच शिक्षकेतर कर्मचारी साजिद शेख, कालिदास सावंत, बालाजी डिकले हे उपस्थित होते तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. राघवेंद्र ताटीपामूल, प्रा. डॉ. हेमंत चांदोरे तसेच प्रा.एन एम अंकुशराव उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पडण्यासाठी महाविद्यालयाचे अधीक्षक हनुमंत जाधव यांनी परिश्रम घेतले.
