भूम (प्रतिनिधी)-  शंकरराव पाटील कनिष्ठ महाविद्यालय भूम च्या एन.एस.एस.शिबिराचा समारोप वालवड या ठिकाणी संपन्न झाला.दिनांक 10 जानेवारी ते 16 जानेवारी या कालावधीत मौजे वालवड ता.भूम येथे कनिष्ठ महाविद्यालयाचे शिबिर आयोजित करण्यात आले होते .शिबिरा दरम्यान स्वच्छता, श्रमसंस्कार, आरोग्य तपासणी, अंधश्रद्धा निर्मूलन, पर्यावरण संवर्धन, प्रबोधनपर व्याख्याने, वृक्ष लागवड,सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध उपक्रम राबविले गेले.

शिबिरामध्ये 50 स्वयंसेवक विद्यार्थी सहभागी होते.कार्यक्रम अधिकारी प्रा.काळे जी.सी., प्रा.सूर्यवंशी महेश, प्रा.कु.पिपरे धनश्री, प्रा.टोंगारे शरद यांनी शिबिरासाठी अथक परिश्रम घेतले. समारोपाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संतोष शिंदे, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष बोराडे डी.डी. वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचर्या डॉ.जगदाळे अनुराधा, सरपंच देवळकर व उपसरपंच कृष्णा मोहिते, ग्रामसेवक आदी मान्यवर उपस्थित होते. या शिबिरामुळे विद्यार्थ्यांमध्ये श्रमसंस्कार,स्वच्छता,व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व गुण वाढीस लागतील अशी अपेक्षा सर्व मान्यवरांनी व्यक्त केली.प्रा काळे यांनी आभार मानले

 
Top