धाराशिव (प्रतिनिधी)-  राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक चा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून सभा, मिरवणुका,निवडणूक प्रचार इत्यादी बाबी नियंत्रित करणे आवश्यक आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निवडणुकीच्या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय,सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, सर्व तहसील कार्यालय तसेच सर्व शासकीय विश्रामगृहे या ठिकाणी, जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या हद्दीत खालील बाबी करण्यास या आदेशान्वये बंदी घालण्यात येत आहे  कोणत्याही प्रकारची मिरवणूक / मोर्चा काढणे,आंदोलन करणे, निदर्शने करणे,उपोषण करणे. कोणत्याही प्रकारची घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणे म्हणणे इत्यादी.कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करणे यास बंदी राहील.हा आदेश 13 जानेवारी ते 07 फेब्रुवारी 2026 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या हद्दीत अंमलात राहील.

 
Top