धाराशिव (प्रतिनिधी)- असंघटित श्रमिक महिलांच्या विकासासाठी सरकारच्या अनेक योजना राबविण्यात येत आहेत. महिला प्रत्येक क्षेत्रात वाटचाल करीत आहेत. श्रमिक महिलांनी सहकारच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबी व्हावे. त्यासाठी श्रमिक महिलांच्या पतसंस्था ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन मराठा महासंघाचे माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार गवारे यांनी केले. श्रमिक महिला को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या नवीन कार्यालयाचा उद्घाटन समारंभ सोमवार, 5 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता रमाई सदन, शिवाजी नगर सांजा रोड येथे संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जिजाऊ माँ साहेब सावित्रीबाई फुले, माता रमाई आंबेडकर आणि अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन अंकुश कृष्णाजी भालेराव यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्ष अनिता आनंद भालेराव, उपाध्यक्ष शाहीन जाकेर शेख, संस्थेच्या संचालक सुवर्णा जवाहर कांबळे, महादेवी बाळासाहेब माळी, शैला प्रसाद दसपुते, सोनाली किरण नेटके, छाया हनुमंत मुठाळ, वैशाली अमोल शिंदे, कविता नीलम चंदनशिवे, अंजली आनंद भालेराव, सविता धनंजय बनसोडे, कविता घुले, मीना मगर, मनीषा मस्के, सायरा तांबोळी, शबनम शेख, भावना मेंढे, अश्विनी काळे, सविता मेंढे, इरशाद शेख, अंकुश भालेराव, आनंद भालेराव, अबोली भालेराव आदी उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांना श्रीहरी चौहान, भाजपा नेते राजसिंह राजेनिंबाळकर, आनंद भालेराव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वतंत्र मजूर जनरल कामगार संघटना (महाराष्ट्र राज्य) व युनिक बहुउद्देशीय सामाजिक संघटना तथा क्रेडिट सोसायटीचे व्यवस्थापकीय संचालक ए. ए. भालेराव यांनी केले. सूत्रसंचालन व आभार शरीफ शेख यांनी केले. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
