धाराशिव (प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झाले. घटनेच्या वृत्तानंतर २८ जानेवारी रोजी जिल्हा माहिती कार्यालय,धाराशिव येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली व्यक्त केली.त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदानाचा उल्लेख केला.
श्रद्धांजली कार्यक्रमास जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपीक नंदू पवार, कनिष्ठ लिपीक दिलीप वाठोरे,वाहन चालक मोहन कोळी,अनिल वाघमारे तसेच जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील सांख्यिकी सहायक अमोल कस्तुरे व वरिष्ठ लिपीक अतुल पवार उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी पुष्प अर्पण करून संवेदना व्यक्त केल्या.या प्रसंगी कार्यालयात शांतता पाळून वातावरण भावनिक झाले होते.
