धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील निखील सुनिल हुंडेकर यांची धाराशिव भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या जिल्हा सरचिटणीसपदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र धाराशिव भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी शुक्रवार दि. 30 जानेवारी रोजी दिले आहे. 

मुळ तुळजापूर येथील असलेले निखील हुंडेकर हे एमबीए फायनान्स असून, 2013 पासून त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम चालू केले होते. महाविद्यालयीन अध्यक्ष, शहरमंत्री, जिल्हा संयोजक, महाराष्ट्र प्रदेश सहमंत्री व परभणी जिल्ह्याचे दोन वर्ष पूर्णवेळ संघटनमंत्री म्हणून काम केले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर निखील हुंडेकर यांना सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपल्यामुळे ते जबाबदारीने काम करीत असे म्हटले जात आहे. भाजपचे जिल्हा दत्ता कुलकर्णी यांनी दिलेल्या नियुक्ती पत्रात आपल्या कार्यकाळात पक्ष संघटन मजबूत करून समाजातील सर्व घटकापर्यंत आपण पक्षाचे विचार पोहोचविण्याचे काम करावे असे सांगितले आहे. 

 
Top