भूम (प्रतिनिधी)- येथील पोलीस ठाण्यात पत्रकार बांधवांचा पत्रकार दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आला. शुक्रवार दिनांक 9 जानेवारी रोजी या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कानगुडे यांच्या हस्ते पत्रकार बांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कानगुडे म्हणाले की, पत्रकार बांधव हे समाज मनाचा आरसा असतात. प्रशासनातील आम्हा अधिकाऱ्यांना ते मार्गदर्शक ठरतात. आमच्या काही चुका झाल्या तर त्या देखील ते आपल्या बातमीच्या माध्यमातून सांगतात तसेच आमचे चांगले काम देखील ते तेवढ्यात समाजासमोर आणण्याचे काम करतात. प्रशासन आणि जनतेचे समन्वयक म्हणून त्यांची भूमिका समाजामध्ये खूप महत्त्वाची व मोठी आहे. भूम पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी असल्याने आम्ही या सत्कार समारंभाचे आयोजन उशिरा केल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद सरोदे यांच्यासह पोलिस ठाण्याचे सर्व कर्मचारी व पत्रकार बांधव हजर होते.
