धाराशिव (प्रतिनिधी)-  जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणूक 2026 चा कार्यक्रम घोषित केला असून,कार्यक्रम घोषित झाल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत,निर्भय व न्याय्य वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या हद्दीतील धार्मिक स्थळे,रुग्णालये, शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध घालण्यात आला आहे.

जिल्ह्यातील धार्मिक स्थळे, रुग्णालये,शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणांच्या जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत (07.02.2026 पर्यंत) निर्बंध घालण्यात येत आहेत. हे आदेश दि.13 जानेवारी 2026 ते 7 फेब्रुवारी 2026 पर्यंत संपूर्ण जिल्ह्यात अंमलात राहतील.

 
Top