धाराशिव (प्रतिनिधी)- भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त व भीमा कोरेगाव शौर्य विजयी दिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर सेवा भावी संस्था धाराशिव संचलित फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समिती व राजगीर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने धाराशिव शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचा म्हणजेच नगराध्यक्ष नगरसेवक व नगरसेविका यांचा सत्कार फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या नियोजित जागेत करण्यात आला, कार्यक्रमापुर्वी तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीस पुष्प अर्पण करुन बुद्ध वंदना घेण्यात आली,शाल, सन्मान पत्र, भारतीय संविधान उद्देशिका विश्लेषण प्रत, व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील संसद मधील भाषण असलेले पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला, प्रस्तावनेत अध्यक्ष गणेश वाघमारे यांनी फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या वतीने घेण्यात येणारे कार्यक्रम तसेच जागेच्या हस्तांतरण आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय सांस्कृतिक सभागृहाविषयी माहिती दिली,नगर सेवक राहुल काकडे यांनी म्हण्टले की,या जागेसाठी व जागेतील नियोजित बाबी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करुन हा विषय मार्गी लावु,नगर सेवक अमित भैया शिंदे म्हणाले की, फुले शाहू आंबेडकर उद्यान कृती समितीच्या जागे संदर्भात आमदार राणा दादा पाटील प्रयत्नशील असुन काही दिवसांपूर्वी आम्ही घेतलेल्या बैठकीत समितीचा विषय घेतला असुन आम्ही या जागेसाठी सर्व नगरसेवक पाठपुरावा करुन हा विषय मार्गी लावु,आपण आम्हाला बोलावुन आमचा सत्कार केला याबद्दल ही त्यांनी आभार मानले,.नाना घाडगे यासह इतर ही मान्यवरांनी आपापले मनोगत व्यक्त केले.यावेळी समितीचे अध्यक्ष गणेश वाघमारे, सचिव प्रवीण जगताप,उपाध्यक्ष संजय गजधने,कोषाध्यक्ष अंकुश उबाळे,बलभीम कांबळे,धनंजय वाघमारे,बाबासाहेब बनसोडे,राणा बनसोडे,सचिन चौधरी,बाबासाहेब गुळीग,लक्ष्मण माने,स्वराज जानराव, विशाल घरबुडवे,श्रीकांत मटकिवाले,अतुल लष्करे, गुणवंत सोनवणे,राजगीर बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष नागनाथ गोरसे,ॲड.अनुरथ नागटिळक बापु कुचेकर,नवनाथ वाघमारे,मेजर सिद्राम वाघमारे, राजेंद्र धावारे,अशोक बनसोडे,पांडुरंग आल्टे,सुनिल वाघमारे,नरेन वाघमारे, मुकेश मोटे,योध्दा सामाजिक संस्थेचे सरफराज पटेल,बाबा कांबळे तर विजयी उमेदवार सह इतर मान्यवर उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बलभीम कांबळे, बाबासाहेब गुळीग,प्रस्तावना गणेश वाघमारे यांनी केले तर आभार संजय गजधने यांनी मानले.
