वाशी (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एस.सी.ई.आर.टी.) पुणे व जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 23 डिसेंबर 2025 रोजी लातूर येथे आयोजित जिल्हास्तरीय नवोपक्रम स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या स्पर्धेत वाशी येथील जे. आय. आर. टी. तंत्र प्रशालेच्या शिक्षिका पूनम गौतम चेडे यांनी जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
धाराशिव जिल्ह्यातून सादर करण्यात आलेल्या विविध नवोपक्रमांपैकी चेडे यांच्या उपक्रमाची गुणवत्ता, उपयुक्तता व सादरीकरण सर्वोत्तम ठरले. या घवघवीत यशामुळे त्यांची राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, येत्या जानेवारी 2026 मध्ये एस.सी.ई.आर.टी. पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्या धाराशिव जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
