धाराशिव (प्रतिनिधी)- व्ही. पी. शैक्षणिक संकुल, छत्रपती संभाजीनगर रोड, धाराशिव येथील श्री साई जनविकास आयटीआय मध्ये दैवी शिल्पकार व सृष्टीचे पहिले इंजिनिअर मानल्या जाणाऱ्या भगवान विश्वकर्मा यांची जयंती अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. हा कार्यक्रम डॉ. प्रतापसिंह पाटील व करण प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व भगवान विश्वकर्मा यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या आधुनिक युगातील पायाभूत सुविधा, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाची संकल्पना भगवान विश्वकर्मा यांच्या विचारातूनच निर्माण झाली असून ते भारतीय स्थापत्यकलेचे आद्य प्रवर्तक आहेत.

या कार्यक्रमास प्राचार्य अमरसिंह कवडे, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. सुरज ननवरे, कृषी महाविद्यालयाचे व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, प्रा. रामचंद्र सुतार, प्रा. सुनील भालेकर, प्रा. काका पौळ, प्रा. सुनील बनसोडे, संकुलाचे लेखापाल प्रा. योगेश मंडलिक, निदेशक सागर सुतार, निदेशक सुनील पुदाले, प्रा. डी. एम. घावटे तसेच आयटीआयचे प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य, सर्जनशीलता व तांत्रिक शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.

 
Top