तुळजापूर (प्रतिनिधी)- नव्याने भाजपमध्ये प्रवेश झालेले अपसिंगा येथील अमीर शेख सक्रिय झाले असून त्यांनी जिल्हा परिषद सर्कलमधील मुस्लिम तसेच अल्पसंख्यांक बांधवांना भाजपला मतदान करण्याचे आवाहन केले. आज दि 31 जानेवारी रोजी सिंदफळ येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच शुक्रवारी आपसिंगा, कामठा, कात्री, ढेकरी, अमृतवाडी येथे भेटीगाठी घेतल्या असून, या निवडणुकीत अल्पसंख्यांक समाज जास्तीत जास्त भाजपच्या सोबत कसे जोडता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अमीर शेख यांनी सांगितले. यावेळी सिंदफळ जिल्हा परिषद सर्कलचे निरीक्षक नगरसेवक दाजी पवार, गटप्रमुख अर्जुन कापसे, गणप्रमुख शंकर गोरे, सज्जनराव साळुंखे, उमेदवार पती आनंद ढाले, अपसिंगा उपसरपंच राहुल साठे, अभिजीत लोके,व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top