धाराशिव (प्रतिनिधी)- देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी आज हुतात्मा दिनी जिल्हा माहिती कार्यालय येथे 11 वाजता दोन मिनिटे मौन पाळून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे,वरिष्ठ लिपिक नंदू पवार,कनिष्ठ लिपिक दिलीप वाठोरे, चित्रा घोडके,मोहन कोळी,अनिल वाघमारे,माध्यम कक्षातील प्रा.बी. एस.उडचण,प्रा.संतोष भांडेकर, युसुफ मोमीन,अमोल कस्तुरे,अतुल पवार,शैलेश खारगे व विनोद जानराव यांची उपस्थिती होती.

 
Top