कळंब (प्रतिनिधी)- तालुक्यातील पाथर्डी येथील माजीसैनिक रविंद्र नारायण जाधव यांच्या सूनबाई प्रतीक्षा शुभम जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) वर्ग 2 ‘पुरवठा अधिकारी’ पदावर निवड झाली आहे.
कठोर परिश्रम, सातत्य आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले असून त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच परिसरातील नागरिकांकडून सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. माजीसैनिक कुटुंबातील सूनबाईने मिळविलेल्या या यशामुळे पाथर्डी गावासह कळंब तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या यशामुळे अनेक युवक-युवतींना प्रेरणा मिळत असून भविष्यातील प्रशासकीय सेवेसाठी तो आदर्श ठरत आहे.
