तुळजापूर (प्रतिनिधी)- “विद्यापीठाच्या नामविस्तारामुळे केवळ नाव बदलले नाही, तर सामाजिक समतेचा आणि परिवर्तनाचा विचार अधिक दृढ झाला,” असे प्रतिपादन प्रा. सिद्धेश्वर सुरवसे यांनी केले. तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाचा नामविस्तार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आयोजित विशेष व्याख्यानात प्रा. सिद्धेश्वर सुरवसे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जीवन पवार हे उपस्थित होते. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांनी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अध्यक्षीय भाषण प्राचार्य डॉ. जीवन पवार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव या विद्यापीठाला लाभणे ही मराठवाड्याच्या सामाजिक व शैक्षणिक इतिहासातील एक क्रांतिकारी घटना आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाला केवळ पदवी मिळविण्याचे साधन न मानता, माणूस घडविण्याचे आणि समाज बदलण्याचे माध्यम मानले आहे असे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मंत्री आडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. कुकडे यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.