धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ.बाबासाहेब आंबेडकर विचार मंचच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त दि.14 जानेवारी 2026 रोजी नालंदा फॅशन डिझायनिंग कॉलेज धाराशिव येथे विद्रोही कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी पंडित कांबळे यांनी आपल्या कवितेतून आजच्या समाजातील वास्तव मांडताना....
“वांझ घोषणा फसवे दावे
वेळीच ओळखा वागणं
हे असेच चालले तर...
सामान्यांचे संपेल जगणं“
कयवित्री भाग्यश्री वाघमारे यांची
“दिशा अंधारलेल्या मनुवाद्यांच्या
विळख्यात बंदिस्त श्वास
चोहोकडून चाललाय
मानवतेचा ऱ्हास“
यातून मानवी मूल्य कसे पायदळी तुडविली जातात ते सांगितलेले आहे.आशा गायकवाड यांची
“दिली तू वृक्षाची छाया
कसे ऋण फेडू भीमराया“
गेय कविता सादर केली.
प्रभाकर बनसोडे यांची एक भीमरावांचे विचार.. तर अनिता ठोकळे यांची लाखात एक होती माझ्या भीमाची लेखणी ,
प्रा. शिवराम अडसुळे यांनी आयुष्याची गाथा मांडली.शामल ताकपिरे यांच्या “सूर्याची सावली.. माता रमाई.. “ या गेय कवितेने रसिकांना मंत्रमुग्ध केले.त्रिशाला ठाणांबीर यांनी “साऊ“ ही कविता सादर केली. शीला पवार यांनी 14 तारखेचं बाबासाहेबांच्या जीवनातील महत्त्व आपल्या कवितेतून व्यक्त केले.उत्कर्षा वाघमारे यांनी “खूप खूप सोसलं आमच्या जातीनं..आ -आईच्या ऐवजी आरक्षणाचा शिकवलं जातं...“ हे सांगितलं. कवी शहाजी कांबळे यांची “अरे अरे माणसा जुन्याचा कशाला पुळका
जग एकविसाव्या शतकाकडे तुम्हीच ओळखा..“ ही कविता भविष्याचा वेध सांगून गेली. तर विजय गायकवाड यांची “आम्ही पांथस्थ हाती निखारे आणि मशाली घेऊन निघालो क्रांतीकडे ...“ रविंद्र शिंदे यांची भीमाचा मी सैनिक आहे रक्तात माझ्या भीम बाणा आहे ..तर पृथ्वीराज चिलवंत यांनी“ माणुस की,माणूस प्राणी“ हे सांगितले. अभिमन्यू इंगळे यांनी असा क्रांतीसुर्य होता.अरुण कांबळे यांनी चला रे मुलांनो शाळेला.अश्विनी बनसोडे यांची शल्य ही कविता,दीपक केंगार यांचा विद्रोह के.व्ही.सरवदे यांची “पारख“ ॲड.अजय वागळे यांचे “न्याय दर्शन“ सोमनाथ लांडगे यांची बाबासाहेब होते म्हणून.. सौरभ लोखंडे यांचे बंडखोर वास्तव.. विकास काकडे यांची गौतम बुद्ध अशेचा किरण तू..सायुरी सूर्यवंशीचा लढा मनातला.. सचिन दिलपाक यांची भीम तुझ्याशी नाळ जोडताना...तर बाळू शिंदे यांनी भिरूड लागलय भिरुड..“ अशा वेगवेगळ्या संदर्भाने बाबासाहेबांचा विद्रोह कवितेतून मांडून रशीकश्रोत्यांना कवींनी मंत्रमुग्ध केले. आणि वेगळ्याच उंची वरती हे कवी संमेलन गेले. यावेळी बाबासाहेब मनोहर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर आभार प्रा. अंबादास कळासरे यांनी मानले. या कार्यक्रमास विचार मंचाचे अध्यक्ष प्रा. रवी सुरवसे,जगदीश जाकते, मारुती पवार, सुप्रसिद्ध कवी रवी केसकर, अमोल गडबडे, राजेंद्र अंगरखे, विकास काकडे ,चंद्रकांत मस्के, जयराज खुने, सुदेश माळाळे, सुनील बनसोडे, ॲड. अजित कांबळे यां यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
