कळंब (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर व शि.म. ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन डीकसळ या गावी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रसंत गाडगे महाराज व मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. पाणलोट व पडीक जमिनीचा चिरंतन विकास या विषय केंद्रित शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ.मनीषा कळसकर, जिल्हा समन्वयक राष्ट्रीय सेवा योजना धाराशिव विभाग यांनी केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असताना त्या म्हणाल्या, राष्ट्रीय विकास व निर्माण यामध्ये विद्यार्थी विद्यार्थिनीची भूमिका अतिशय महत्त्वाचे आहे. आजचे विद्यार्थी हे राष्ट्र विकासाचे स्तंभ आहेत. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती रुजली पाहिजे. त्यापुढे म्हणाल्या, राष्ट्रीय विकास व निर्माण मध्ये पर्यावरणाची भूमिका अतिशय महत्त्वाचे आहे. समाज व पर्यावरण यांचा समतोल साधून राष्ट्रीय विकास व निर्माण करता येईल असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.अशोकराव मोहेकर साहेब , सचिव ज्ञान प्रसारक मंडळ हे लाभले. ते म्हणाले विद्यार्थ्यांनी मोबाईल केंद्रित न राहता पुस्तक केंद्रीत राहावे. आजचा विद्यार्थी मोबाईलच्या स्क्रीन मध्ये अडकला असून त्यांनी वेळेत यामधून बाहेर पडले पाहिजे व व्यक्तिमत्त्वाचा विकास केला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भगवान सर यांनी अध्यक्षीय समारोप केला. ते म्हणाले विद्यार्थ्यांनी आत्मकेंद्री न बनता ज्ञानकेंद्री बनावे. राष्ट्रीय सेवा योजना च्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकास करून समाजाचा विकास करता येईल असे ते म्हणाले. पर्यावरण समाज आणि विद्यार्थी या त्रिवेणी संगमातून समृद्ध देशाची प्रगती करता येईल असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. ताटीपामुल सर यांनी केले व आभार प्रा. अंकुशराव सर यांनी मानले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. वर्षा सरवदे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी ,डॉ. दत्ता साकोळे, डॉ. दादाराव गुंडरे, डॉ. दीपक सूर्यवंशी, डॉ. नामानंद साठे,डॉ. संदीप महाजन, डॉ. मीनाक्षी जाधव, श्रीमती अर्चना मुखेडकर,डॉ. जयवंत ढोले, डॉ. संजय सावंत, डॉ. चंदनशिव, डॉ. वाघमारे, प्रा. शिंपले, प्रा. दळवी, प्रा. जमले ,प्रा. तांबोळी,प्रा. शिंदे,प्रा. रोहिणी लोकरे,प्रा. पालके, प्रा. संदीप देवकते सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के डी जाधव सर, रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. हेमंत चांदोरे, उपप्राचार्य जयंत भोसले, प्रा. विलास अडसूळ चे विशेष सहकार्य लाभले. तसेच व महाविद्यालयाचे अधीक्षक हनुमंत जाधव, सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे, बंडगर व अर्जुन वाघमारे यांनी परिश्रम घेतले.
