मुरुम (प्रतिनिधी)-  भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून नगरपरिषद मुरूम येथे ध्वजारोहण सोहळा अत्यंत उत्साहात आणि अभिमानाच्या वातावरणात पार पडला.

नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. बापूराव पाटील (काकासाहेब) यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. लोकशाहीच्या पर्वातील हे पहिलेच ध्वजारोहण असल्यामुळे नागरीकामधे कमालीचे चैतन्य होते.या मंगलसमयी काकासाहेबां समवेत उपस्थित राहून प्रसंगी तिरंग्याला वंदन करून उपस्थित सर्व नागरिक, पदाधिकारी आणि कर्मचारी बांधवांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी मुख्याधिकारी सचिनजी भुजबळ, माजी नगराध्यक्ष रशीद शेख, विद्यमान उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, नगरसेवक अमर भोसगे, गौस शेख, गणेश अंबर, रुपचंद गायकवाड, सौ. ढोबळे ताई, सौ. अंबुसे ताई, सौ. शेळके ताई, सौ.बनसोडे ताई, सौ. दुर्गे ताई, सौ. बंडगर ताई, सौ. कंटेकुरे ताई, सौ. बन्ने ताई, सौ. मुल्लाताई, सौ. गायकवाड ताई यांच्यासह नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. “लोकशाहीची मूल्ये जोपासण्याचा आणि मुरूम शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार आज आम्ही पुन्हा एकदा दृढ केला आहे.“

 
Top