धाराशिव, (प्रतिनिधी)-   येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे 77 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी सर्व प्रथम शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे, संस्थामाता सुशिलादेवी यांच्या पुतळ्याचे पूजन आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

लेफ्टनंट,प्रो डॉ केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली एन सी सी कॅडेटनी नेत्रदीपक संचालन केले. सदर प्रसंगी पायलट करवर रोहन, करडे प्रेम, रिटे दिक्षीता, कुंभार गौरी, परेड कमांडर मनोज बचाटे, दहिना मार्कर सुरवसे प्रीतम, सुपर नंबरी गोरवे आकाश यांनी उत्तम कामगिरी केली. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ग्रंथालय विभागाच्या वतीने डॉ मदनसिंह गोलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली वाचन संस्कृती जोपासण्यासाठी उत्तम वाचक, समीक्षक, उत्तम सारांश लेखक असे पुरस्कार शिक्षक आणि विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच मराठी विभागाच्या वतीने देशभक्ती पर गुलमोहर अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी प्रा. राजा जगताप, डॉ. अरविंद हंगरगेकर यांच्या सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाले.


 
Top