धाराशिव (प्रतिनिधी)-  शहरामध्ये राजमाता जिजाऊ यांची जयंती विविध सामाजिक उपक्रम राबववून मोठ्या उत्साहात दि.12 जानेवारी रोजी साजरा करण्यात आली. सकाळपासूनच जिजाऊ चौकात जिजाऊ प्रेमींनी जिजाऊंना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली होती. जिजाऊ उत्सव पारंपारिक पद्धतीने मात्र मोठ्या जल्लोषात साजरा केल्याने संपूर्ण परिसर जिजाऊंच्या जयघोष यांनी दणाणून गेला होता.

धाराशिव येथील जिजाऊ चौकामध्ये मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समिती अध्यक्ष प्रणिता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मान्यवरांच्या हस्ते जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, नगराध्यक्ष नेहा काकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तर वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आणि विविध संस्थांनी भाग घेऊन जिजाऊंच्या विचारांना अभिवादन केले.

या उत्सवांमध्ये जिजाऊंच्या कार्याचा गौरव करण्यात आला आणि त्यांच्या विचारांवर आधारित सामाजिक उपक्रम राबवले गेले. यामध्ये रक्तदान आणि वृक्षारोपण याचा समावेश आहे. जिजाऊ चौकात जिजाऊंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. तर मध्यवर्ती जिजाऊ जन्मोत्सव समितीच्यावतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. विशेष म्हणजे आज जन्मलेल्या मुलींना कपडे व मातांना साडी चोळी आदींचे वाटप करण्यात आले. तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेविका यांचा सत्कार करण्यात आला. तर विद्यार्थ्यांनी वेशभूषा काढून शोभायात्रा व वाहन रॅली काढण्यात आली. या कार्यक्रमास जिजाऊ प्रेमी, शिवप्रेमी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

 
Top