भूम(प्रतिनिधी) येथील जिल्हा परिषद प्रशाला भूम येथे 1987/88 च्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणामध्ये संपन्न झाला.
11जानेवारी2 026 गेटटूगेदर साठी प्रथमता रांगेत उभा राहून राष्ट्रगीताने, शाळेमध्ये जाऊन सर्व विद्यार्थ्यांनी बेंचवर बसून हजेरी दिली. नंतर जे विद्यार्थी उशिरा उपस्थित झाले. त्यांना शिक्षकांच्या छड्या किंवा शिक्षा देण्यात आली. तदनंतर याच ठिकाणी नाश्ता झाला व पुढील कार्यक्रम आकरे मंगल कार्यालय मध्ये आगे कुछ झाल्यानंतर या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी जे गुरुजी व विद्यार्थी दिवंगत झालेले आहेत. अशांना आदरांजली अर्पण करून, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सातपुते, रेंगे, जगदाळे व जिल्हा परिषद शाळेचे कार्यरत मुख्याध्यापक कांबळे यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर आलेल्या दहावीतील सर्व विद्यार्थ्यांचे स्वतःहून ओळख करून देण्यात आले. कारण बऱ्याच कालावधीनंतर हे विद्यार्थी भेटल्याने त्यांचे चेहरे एकमेकांना ओळखू येत नव्हते म्हणून सर्वांनी स्वतः आपापली ओळख करून दिली. ओळख झाल्यानंतर संजीवन सातपुते , रेंगे, जगदाळे व तात्या कांबळे सर यांनी मार्गदर्शनात्मक संवाद साधला. काही विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर स्नेहभोजन झाले थोड्या विश्रांतीनंतर या ठिकाणी संगीत खुर्चीचा खेळ रंगला. यामध्ये अनेक विद्यार्थी मागे पडले काहींचा नंबर आला. यातच सर्वांना आनंद झाला.
दरम्यान जिल्हा परिषद शाळेमध्ये मागेपुढे अतिक्रमण झाले आहे जी जागा उरलेले आहे. त्या ठिकाणीही तळीरामाचा जुगारी यांचा वावर असतो. त्यामुळे या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने 15000 रुपये रोख स्वरूपात मुख्याध्यापक तात्या कांबळे यांच्याकडे शाळेच्या बाजूने कंपाऊंड मारण्यासाठी सुपूर्द केले. नंतर फोटो सेक्शन होऊन सर्व सवंगडी जातानी या ठिकाणी काय विद्यार्थ्यांना जाऊ वाटले नाही निरोप ही देवू वाटला नाही. काही विद्यार्थ्यांना गहिवरून आले. परंतु हा स्नेह मेळावा मोठ्या उत्साहात थाटामाटात संपन्न झाला. यासाठी शेख तय्यब,कैलास तांबे,धनंजय खामकर,विजय साबळे,वंदना वाईकर,संध्या सातपूते,चंद्रकांत साठे,मनिषा खोले, तूकाराम देशमाने, मनिषा वैदय(कूलकर्णि), मनीषा जोशी, संजय वडेकर, प्रशांत धर्मे, ऊज्वला सोनावणे, निर्मला मडके, सुनिता म्हेञे, सूहास जोशी, काशीनाथ व्हटकर, दत्ताञय शिंदे, मूकुंद लगाडे, धनंजय देशमूख, संजय शिंदे, अर्जुन सीतापे, वसंत माळी यांनी परिश्रम घेतले. कुमार सानू प्रस्तुत महेश कुमार कराओके म्युझिकल प्रोफेशनल ऑर्केस्ट्रा सोनगाव करमाळा पुणे यांचा हिंदी मराठी भावगीत भक्तीगत सुपीक कव्वाली चित्रपट गीते असा कार्यक्रम संपन्न झाला.सूत्रसंचालन अलीम शेख सर यांनी केले.
