तुळजापूर (प्रतिनिधी)-   श्री तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवातील पाचव्या माळी देणे गुरुवार दिनांक एक रोजी देवीच्या सिंहासनावर भवानी तलवार अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. आज नवे वर्षाचा प्रथम दिन असल्याने भाविकांनी देवी दर्शनाला मोठी गर्दी केली होती. अनेक भाविकांनी श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन आपल्या नव्या वर्षाच्या कामकाजाचा आरंभ केला. श्री तुळजाभवानी श्री तुळजाभवानी मातेच्या सिंहासनावर अभिषेक पूजा झाल्यानंतर भवानी तलवार अलंकार पूजा मांडण्यात आली होती.

 या पूजेबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की, स्वराज्य निर्माण करण्यासाठी  छत्रपती श्री शिवाजी महाराज यांना देवीने भवानी तलवार दिली त्याची आठवण म्हणून या रुपामध्ये देवीस उत्सव विशेष पूजा बांधली (मांडली) जाते. आज दिवसभर सर्वच रांगा भाविकांनी भरभरून वाहिल्या आज तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

 
Top