वाशी (प्रतिनिधी) :कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे घाट पिंपरी येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन धाराशिव जिल्हा परिषदचे माजी सदस्य मा. बाबुराव सुरवसे यांच्या शुभहस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक कदम होते. यावेळी श्री. जे. एस. सातपुते, प्रा. डॉ. रवींद्र कठारे, प्रा. शामसुंदर डोके, कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. अनंत पाटील, प्रा. डॉ. नेताजी देसाई, प्रा. डॉ. देवशाला रसाळ आदी उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना बाबुराव सुरवसे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणातून जीवन समृद्ध करावे, असे सांगितले. प्राचार्य डॉ. अशोक कदम यांनी ‘शिकण्यासाठी या आणि सेवेसाठी बाहेर पडा’ हा कर्मवीर मामासाहेब जगदाळे यांचा संदेश आत्मसात करण्याचे आवाहन केले. तर प्रा. शामसुंदर डोके यांनी तरुणांनी शाश्वत ग्रामीण विकासासाठी कार्य करावे, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. नेताजी देसाई यांनी केले, सूत्रसंचालन प्रा. महादेव उंद्रे यांनी तर आभार प्रा. डॉ. देवशाला रसाळ यांनी मानले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top