तुळजापूर (प्रतिनिधी)- स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त तुळजाभवानी महाविद्यालय, तुळजापूर येथे सोमवार दिनांक 12 जानेवारी 2026 ते सोमवार दिनांक 19 जानेवारी 2026 या कालावधीत स्वामी विवेकानंद जयंती सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. या सप्ताहाचे उद्घाटन / व्याख्याते प्रो. डॉ. रमेश चौगुले संचालक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उपपरिसर धाराशिव यांचे  विषय : “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 : संधी आणि आव्हाणे “ वर व्याख्यान आयोजित करण्यात आलेला आहे. अध्यक्ष : प्र. प्राचार्य, डॉ. जीवन पवार  तसेच प्रमुख उपस्थिती : मा. श्री आप्पासाहेब पाटील - सदस्य, महाविद्यालय विकास समिती यांच्या उपस्थितीमध्ये 12 जानेवारी 2026 रोजी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात येणार असून, या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

विवेकानंद जयंती सप्ताहाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत स्वामी विवेकानंद यांच्या जीवन व विचारांवर आधारित  “जागर : आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञानाचा“ व्याख्यानमाला वर्ष पहिले या  व्याख्यानमाला,  निबंध  वक्तृत्व, चित्रकला स्पर्धा,  रांगोळी स्पधा, टॅलेंट सर्च| सुगम गायन | कराओके| समूह गीत, गोळा फेक, थाळी फेक,कब्बडी स्पर्धा, खो-खो लांब उड्डी स्पर्धा ,रक्तदान शिबीर/ रक्तगट तपासणी, ज्ञानशिदोरी: मोफत पुस्तक वाटप, तसेच युवकांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, चारित्र्यनिर्मिती, राष्ट्रभक्ती व सामाजिक बांधिलकी निर्माण व्हावी, हा या सप्ताहाचा मुख्य उद्देश आहे. सप्ताहाचा समारोप 19 जानेवारी 2026 रोजी समारोप समारंभ  करण्यात येणार आहे. या विवेकानंद जयंती सप्ताहात महाविद्यालयातील प्रा. डॉ. मंत्री आर. आडे - स्पर्धा समन्वयक, डॉ. बापूराव बी. पवार , डॉ. नेताजी काळे,,प्रा. बालाजी एच. कऱ्हाडे, प्रा .स्वाती बैनवाड , प्रा. बालाजी जे. कुकडे  प्रा. सुदर्शन गुरव , प्रा. आर. एस. कोरे, प्रा. एफ. एम. तांबोळी, प्रा. डॉ. एस. एस. निपानीकर, प्रा. शिवाजी जगताप,प्रा. के. एस. कदम,. अनिल एम. नवात्रे,प्रा. जे. बी. क्षिरसागर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असून, कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात आले आहे. या सप्ताहात अंतर्गत “जागर : आधुनिक शिक्षण व तंत्रज्ञानाचा“ या व्याख्यानमालेचा सर्व विद्यार्थ्यांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी गुरुदेव कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.

 
Top