धाराशिव (प्रतिनिधी)-  चिलवडी येथील संजीवनी विद्यालय माहे - सप्टेंबर - 2025 मध्ये महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षेत विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले.

इलेमेंटरी ग्रेड परीक्षेत एकूण 18  विद्यार्थी विदयालयातून प्रविष्ट झाले. यांपैकी अ ग्रेड मध्ये 12, ब ग्रेड मध्ये 06 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल 100 टक्के लागला असून,  इंटरमिडीएट ग्रेड परीक्षेत एकूण 34 विद्यार्थी विद्यालयातून प्रविष्ट झाले यांपैकी अ ग्रेड मध्ये 34 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. सदर परीक्षेकरीता कलाध्यापक नानासाहेब बोराडे यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती रेखा शिंदे, सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सदर यशाबद्दल सर्व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.

 
Top