भुम (प्रतिनिधी)- भुम नगरपरिषद च्या आज झालेल्या उपनगराध्यक्षपदी अपेक्षाप्रमाणे जनशक्ती विकास आघाडीच्या नगरसेविका जयश्री प्रशांत साठे यांची निवड करण्यात आली साठे यांची निवड झाल्याने शहरातील विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विजय उत्सव साजरा केला. उपाध्यक्ष पदाच्या निवडीच्या कार्यक्रमावेळी उपाध्यक्ष पदासाठी जयश्री प्रशांत साठे यांची उपाध्यक्ष पदासाठी जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष भाजपाचे राज्य सदस्य बाळासाहेब शिरसागर यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. तसेच जनशक्ती विकास आघाडीच्या गटनेतेपदी रुपेश शेंडगे यांची निवड तर जनशक्ती विकास आघाडीच्या प्रथम विठ्ठल बागडे यांची निवड करण्यात आली. तर स्वीकृत सदस्य म्हणून यशवंतराजे धनाजी थोरात यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर जनशक्ती विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांकडून शहरातील मुख्य चौकात अक्षरशा दिवाळी साजरा करण्यात आली. नंतर जनशक्ती विकास आघाडीचे अध्यक्ष विजयसिंह थोरात व बाळासाहेब शिरसागर यांनी शहरातील नागरिकांनी जो आम्हाला कौल दिलेला आहे त्या कौलाला विसरून आम्ही शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगून जनतेच्या सेवेसाठी आम्ही 24 तास तयार असल्याचे सांगून जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य असून आम्ही सदैव जनतेच्या सुखदुःखात राहणार असल्याचं सांगितले.
