भूम (प्रतिनिधी)- एकमेकांच्या सहकार्याने भूम शहराचा विकास करु,नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी तुमच्या जनतेने सभागृहात पाठवले आहे .सर्व नगरसेवक मिळून शहरातील विकास कामे करू, नगराध्यक्षा संयोगिता संजय गाढवे, गटनेता निवड,उपनगराध्यक्ष निवड स्वीकृत सदस्य निवड प्रसंगी बोलत होत्या.

पुढे बोलताना म्हणाले की सभागृहामध्ये येताना राजकीय जोडे तसेच राजकीय विषय सभागृहामध्ये जनतेच्या कामासाठी सर्व मिळून प्रयत्नशील राहू असे गाढवे बोलत होत्या .यावेळी आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या गटनेतेपदी नगरसेवक सुरज गाढवे यांची निवड करण्यात आली तसेच स्वीकृत सदस्य पदी संजय गाढवे यांची निवड झाली .

त्यावेळी आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या नूतन नगरसेवक सुरज गाढवे ,अभिजीत शेटे ,मंगल नाईकवाडी ,भाग्यश्री माने , तौफीक कुरेशी , रिमा  शिंदे यांचा नगराध्यक्षा सहयोगिता गाढवे यांनी सत्कार केला .तसेच गटनेते पदी सुरज गाढवे व स्वीकृत सदस्य पदी संजय गाढवे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला .यावेळी धनंजय मस्कर, प्रदिप चौधरी, कैलास पवार, समाधान पोतदार, आसिफ जमादार, बालाजी माळी, सुनील माळी, खंडेराव गोयकर, नितीन साठे, बाळासाहेब अंधारे, सागर टकले , बाळासाहेब अंधारे, नुतन सुर्वे, मयूर शेटे, मुशीर शेख, श्रीराम बोराडे, आकुबाई पवार, संजय शिंदे, अमोल शिंदे, अखतर जामदार, रईस काझी,प्रथम वराडे, पोपट धावारे,तानाजी शिंदे,धनाजी गाढवे,मंगल आकरे,शितल शिंदे, यांच्या सह पदाधिकारी नगरपरिषदेचे प्रभारी मुख्याधिकारी प्रवीण जाधव ,नगरपरिषद चे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


 
Top