भूम (प्रतिनिधी)-  येथील पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी संपन्न झाली. धाराशिव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी ही वार्षिक तपासणी संपन्न केली. 

यावेळी पोलिस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी मानवंदना देऊन पोलीस अधीक्षक रितू खोखर यांचे स्वागत केले. या वार्षिक तपासणी वेळी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी उत्कृष्ट काम करणाऱ्या अधीकारी व कर्मचारी यांचा प्रमाणपत्र व बक्षिस देऊन गौरव केला. यावेळी प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक आर मेघना,उपविभागीय पोलीस अधीकारी अनिल चोरमले हे हजर होते. वार्षिक तपासणी दरम्यान पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी पोलीस ठाण्याच्या वार्षिक कामकाजाची सविस्तर तपासणी केली. या तपासणी दरम्यान त्यांनी काही सूचना केल्या व समाधान व्यक्त केले. यावेळी या वर्षांमध्ये उत्कृष्ट काम करणारे अधिकारी सपोनि संजय झराड, पोना संदेश क्षिरसागर, महिला पोह शबाना मुल्ला व रतन घोगरे यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव केला. यावेळी पोलीस निरीक्षक श्रीगणेश कानगुडे यांनी स्टार ऑफ द मंथ हा उपक्रम चालू केला आहे. त्यावरही पोलीस अधीक्षकांनी तपासणी केली. तसेच ज्या ज्या कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांनी कोणत्या गुन्ह्याची सोडवणूक केली आहे. याचीही माहिती घेतली. वार्षिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर अधिकारी व कर्मचारी यांच्याशी मुक्त संवाद साधला. यावेळी भूम पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधिकारी ,कर्मचारी हजर होते.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top