भूम (प्रतिनिधी)-  जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे शनिवार दिनांक 4 जानेवारी रोजी इयत्ता 6 वी वर्गात शिकत असलेली कु अनुष्का पाटोळे या मुलीचा छळ करुण तिने आत्महत्या केल्याचा बनाव करून तिची हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणात अंत्यत चालाखीने, हुषारीने हत्येचा पुरावा नष्ट करून करून ही आत्महत्या आहे असे भासवण्यात आले आहे. राज्याचे  मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची  चौकशी करून हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात घ्यावे. या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यासाठी व त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी लातूर जिल्हाधिकारी यांना देखील सहआरोपी करण्यात यावे. अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे

या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने तत्काळ कारवाई न केल्यास सकल भूम तालुक्याच्या वतीने मांतग समाजाने सोमवार  दिनांक 12 रोजी भूम शहरातील गोलाई चौकात रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय भूम यांच्या कार्यालयाच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा गृहमंत्रालय यांना देण्यात आले आहे. 

या निवेदनावर दत्ता साठे, अण्णा साठे, बबन साठे , नारायण साठे, प्रदीप साठे, किरण साठे, सचिन साठे, गणेश साठे, शैलेश साठे,रोहीत गायकवाड, नितीन साठे, अमोल साठे, रविंद्र साठे, प्रविण साठे,सचिन साठे, सोहन साठे,सुजित साठे, मनोज क्षीरसागर, दत्ता पाटुळे, ओंम साठे संतोष साठे, किरण साठे,कुणाल आडागळे, आकाश साठे, राम साठे, दिनेश दुबळे,जितेंद्र साठे, गणेश साठे, प्रमोद आडागळे,लखन साठे यांच्या सह्या आहेत.

 
Top