धाराशिव (प्रतिनिधी)- पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हे शाखेतील पथक हे दि. 06.01.2026 रोजी धाराशिव जिल्ह्यात मालाविषयक गुन्हे उघडकीस आणणे कामी गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, एक इसम बसस्थानकातील प्रदीप हॉटेल जवळील गेट मध्ये काळ्या रंगाची मोटरसायकल घेवून थांबला असुन ती चोरीची मोटरसायकल आहे. अशी खात्रीलायक बातमी मिळालेवरुन पथकाने लागलीच तेथे जाउन सूर्यकांत उर्फ सुरज उर्फ रावसाहेब मस्के वय35 वर्ष रा मारवडगली धाराशिव ता जि धाराशिव यास ताब्यात घेतले. गुन्ह्याच्या अनुशंगाने त्याच्याकडे तपास केला असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. पथकाने त्याच्या ताब्यातून नमूद गुन्ह्यातील चोरीची मोटरसायकल क्र एमएच 14 एच.टी. 1240 चेसी नं- ME4JVC65DGKD061734 इंजिन नंबर JC65ED0132273 एकुण 40 हजार रूपये किंमतीची मोटरसायकल हस्तगत केली आहे. नमुद आरोपीस पुढील कार्यवाही कामी धाराशिव पोलीस ठाणे येथे हजर केले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या आदेशावरुन स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांचे आदेशावरुन पोलीस हावलदार बळीराम शिंदे, राहुल नाईकवाडी, चव्हाण, अशोक ढगारे, चालक पोअं दहीहंडे यांच्या पथकाने केली आहे.
