मुरुम (प्रतिनिधी)- कारंजा येथील वैदर्भीय ना चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी अत्यंत उत्साहात कारंजा येथील महेश भवन सभागृहात पार पडले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेवापूर तालुका जळकोट येथील शिक्षक श्री राजू नागरगोजे सरांना मौलाना अब्दुल कलाम राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने कारंजा/मानोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सई ताई डहाके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या दिमागदार सोहळ्याचे उद्घाटन कारंजा मानोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार सहित प्रकाश डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थापक अध्यक्ष व सचिव एकनाथ दादा पवार व पूनम एकनाथ पवार, डॉ. पंकज काटोले, पुंडलिक गोसावी, विजय तेलगोटे, शारदाताई  भुयार, आशाताई मेश्राम, ज्योतिषाचार्य सागर महाराज देशमुख आदी प्रमुख पाहुणे उपस्थित होते. शेवटी आभार पुंडलिक गोसावी सरांनी मांडले.


 
Top