धाराशिव (प्रतिनिधी)- जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख तसेच आहरण व संवितरण अधिकारी यांना कळविण्यात येते की,महालेखाकार कार्यालय,नागपूर व कोषागार कार्यालय,धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने निवृत्तीवेतनधारकांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने 28 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता कोषागार कार्यालय,धाराशिव येथील बैठक हॉलमध्ये पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या अनुषंगाने जिल्हा कोषागार अधिकारी, धाराशिव यांच्या वतीने जिल्ह्यातील सर्व कार्यालय प्रमुख,आहरण व संवितरण अधिकारी तसेच निवृत्तीवेतनाशी संबंधित कामकाज करणारे अधिकारी व कर्मचारी आणि सर्व निवृत्तीवेतनधारक यांनी आपल्या प्रलंबित अथवा इतर समस्यांचे निराकरण करून घेण्यासाठी आवश्यक ते अभिलेख व कागदपत्रांसह वरील ठिकाणी उपस्थित राहावे. निवृत्ती वेतनधारकांच्या समस्या तात्काळ मार्गी लावण्याच्या दृष्टीने या पेन्शन अदालतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन अर्चना नरवडे,जिल्हा कोषागार अधिकारी, धाराशिव यांनी केले आहे.