धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‌‘जागर संविधानाचा‌’ हा सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येत असून, या उपक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक स्व. विठ्ठल शिंदे यांचे नातू व प्रसिद्ध लोकगायक प्रल्हाद शिंदे यांचे सुपुत्र गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचा धाराशिव शहरात विशेष कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी बोलताना गायक चंद्रकांत शिंदे यांनी आपले आजोबा स्व. विठ्ठल शिंदे व वडील स्व. प्रल्हाद शिंदे यांच्या गायन कलेचा वारसा पुढे चालवत असल्याचा अभिमान व्यक्त केला. तसेच भाऊ आनंद शिंदे व मिलिंद शिंदे यांच्यासह संपूर्ण शिंदे परिवार लोककलेच्या माध्यमातून सामाजिक प्रबोधनाचे कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमामुळे धाराशिव जिल्ह्यातील सांस्कृतिक व सामाजिक वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली असून, ‌‘जागर संविधानाचा‌’ उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

 
Top