भूम (प्रतिनिधी)-  25 वर्षांनी देश, विदेशातून भूममध्ये शिकलेले माजी विद्यार्थी एकत्र आले. गुरुदेव दत्त हायस्कूल मधील इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा रामहरी मंगल कार्यालयात उत्साहात झाला. यानिमित्त तब्बल 25 वर्षांनी एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी शालेय आठवणींना उजाळा दिला.

भूम येथील गुरुदेव दत्त हायस्कूल मधील 2001 -02 वर्षी इयत्ता दहावी वर्गात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या या स्नेहसंमेलन कार्यक्रमास 

सतीश देशमुख, किरण जाधव, विठ्ठल कोळी, अनिल मोटे, संदीप बागडे, महावीर भोपलकर, ए. के. गायकवाड ,कमलाकर साबळे, चंद्रकांत तांबे, अंकुश उगलमुगले, गपाट, कुटे, बारबोले, बांगर, पालकर, गायकवाड, अलगट, पालके, शेळके, शेख यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कल्याणराव मोटे हे होते .कार्यक्रमाची सुरुवात आलम प्रभू देवस्थान येथे आरती करून करण्यात आली. त्यानंतर गुरुदेव दत्त हायस्कूलला विद्यार्थ्यांनी भेट दिली. राष्ट्रगीत म्हणून शाळेत ज्याप्रमाणे वर्गाची सुरुवात होते त्याप्रमाणे करण्यात आली.

माजी विद्यार्थ्यांनी एकमेका सोबत संवाद साधला काही विद्यार्थी तर अमेरिका, कॅनडा, गुजरात, मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा, इचलकरंजी, धाराशिव या ठिकाणाहून कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले होते. यावेळी अमोल गुंजाळ, सचिन पौळ,धनंजय शेटे, अमोल माळी, मयूर शाळू, संतोष वीर, प्रेम महाजन, सुजित वेदपाठक, आमीत होळकर, भरत गाढवे, सुहास माळी, हरी बोत्रे, संदीप गरड, दिपाली वरवडे, नूर मोमीन, माधवी मोकाशे, ॲड अमरजा खोसे, हर्ष सातपुते, स्नेहा मोटे, कांचन जगताप, हेमा जाधव, मनीषा खराडे, सुप्रिया माळी आधी विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते. 

 
Top