कळंब (प्रतिनिधी)- येथील आगाराची जायफळ मुरुड ते कळंब बस क्र. एम. एच. 20 बी. एल. 1891 ही बस मुरुड जयकळ शिराढोण मार्गे कळंब जाणारी बसमध्ये मुरुड ते शिराढोण या प्रवासा दरम्याण बळीराम व्यंकट देवकर वय 50 रा. वरपगाव ता. केज या प्रवाशांचे प्रवास करीत असताना खिशातील पॉकेट बस मध्येच पडले. त्या पाकीट मध्ये जवळपास तीन हजार दोनशे रुपये व इतर महत्त्वाचे कागदपत्रे असल्याचे कर्तव्यावर असलेले वाहक सचिन गिरी यांना निदर्शनास आले त्यांनी बस मधील हे पॉकेट उचलून शिराढोण येथील वाहतूक नियंत्रक प्रशांत नानजकर यांच्या स्वाधीन केले. संबंधित प्रवाशांचा वाहतूक नियंत्रक यांनी पॉकेट्यातील कागदाच्या आधारा वरून शोध घेतला असता ते केज तालुक्यातील वरपगाव येथील असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याने त्या गावाशी संपर्क साधून त्यांनी त्या प्रवाशाला शिराढोण येते बोलावून संबंधित पॉकेट व पैसे वाहक सचिन गिरी व सहाय्यक वाहतूक निरीक्षक आर. आर. लोहार यांनी त्या प्रवाशाला संबंधित रक्कम व पॉकेट सुपूर्त केले. तर समाजात एसटीच्या वाहक, चालकाचा आजही त्या सोन्या इतकाच शुद्ध प्रामाणिकपणा पाहावयास मिळाला. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
