धाराशिव (प्रतिनिधी)-  पोलीस मुख्यालय कवायत मैदानावर किल्ला उभरण्याचे कार्याचे भुमिपुजन विशेष पोलीस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र यांच्या हस्ते पार पडला. 

यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक रितु खोखर, परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक मेघना, डीवायएसपी सानप, स्थानिक गुन्हे शाखा विनोद इज्जपवार, पोलीस कल्याण गायकवाड, राखीव पोलीस निरीक्षक पठाण, पोलीस अधिकारी, अमंलदार तसेच कार्यालयनी कर्मचारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तसेच दि.23.01.2026 रोजी वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिक्षेत्र यांनी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय येथे सभागृहात मिंटगीच्या वेळी आगामी काळातील होणाऱ्या निवडणुका निमीत्त पोलीस विभागाकडून करावयाच्या कर्तव्याबाबत योग्य मार्गदर्शन केले. तसेच जिल्ह्यातील कायदा व व्यवस्था आणि पोलिसी कामकाजाबाबत आढावा घेतला. तसेच धाराशिव जिल्ह्यातील मालाविषयक व शरीराविरुध्दचे उघडकीस न आलेले गुन्हे जास्ती जास्त प्रमाणात उघडकीस आणणे बाबत योग्य त्या सुचना दिल्या. तसेच अवैध धंद्यावर जास्तीत जास्त कारवाया करण्या बाबत सुचना दिल्या.


 
Top