कळंब (प्रतिनिधी)- शहरातील सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील महोत्सवामध्ये 3 जानेवारी रोजी शहराच्या मुख्य रस्त्यावरून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भव्य मिरवणूक होणार आहे. या मिरवणुकीमध्ये विद्यालयातील विद्यार्थ्यांनी लेझीम, टिपरी नृत्य, वारकरी, विविध समाजसुधारकांच्या नेत्यांच्या वेशभूषा, घोडे, रथ यांचा समावेश मिरवणुकीमध्ये होणार आहे. त्याचबरोबर विद्यालयातील तसेच परिसरातील उच्च पदस्थ महिलांचा सन्मान सोहळा विद्यालयात होणार आहे. विद्यालयातील माजी विद्यार्थिनी ज्यांनी यश संपादन करून शासकीय सेवेमध्ये लागलेले आहेत त्यांचादेखील सन्मान विद्यालयात होणार आहे. तरी शहरातील नागरिकांनी या जयंती महोत्सवाचा आनंद घ्यावा व जयंती महोत्सवामध्ये सामील व्हावे असे आव्हान विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य काकासाहेब मुंडे, उपप्राचार्य डॉ मीनाक्षी शिंदे भवर यांनी केले आहे.

 
Top